Type Here to Get Search Results !

करोडोंच्या मिळकतीचे बनावट खरेदीखत व सरकारी शिक्के बनवणाऱ्या आरोपीस सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


Supreme Court grants bail to accused of making fake purchase deed and government stamps worth crores of rupees

 

 

पुणे, दि. २६ मे २०२५ (Checkmate Times): पुण्याचे शिवाजीनगर एक प्राईम लोकेशन आहे. या प्राईम लोकेशन मधील एका जमिनीचा बनावट दस्त तयार करून, जमीन हडपल्याच्या प्रकरणात एकावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली होती. यानंतर पुण्यातील काही वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करून, युक्तिवाद करत आरोपीला जामीन मिळवून दिलाय.

 

याबाबत अॅड. आदित्य बारटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर मौजे भांबुर्डा येथील मिळकतीची आरोपी नामे कुमार हरिश्चंद्र यादव याने बनावट कागदपत्रे बनवली. यानंतर फिर्यादी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून, त्यावर शासकीय अधिकाऱ्यांच्या पदाचे बनावट गोल शिक्के तयार करुन, ते त्यावर उमटवून, सदर बनावट कागदपत्र खरे आहेत असे भासवून, ते नगर भूमापन अधिकारी  कार्यालयामध्ये दाखल करून त्या आधारे फिर्यादी यांची मिळकत हडप करण्याचा प्रयत्न करून, फिर्यादी यांची फसवणुक केल्याचा गुन्हा आरोपींवर लावण्यात आला होता. यामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली होती.

 

यानंतर सदर आरोपी तर्फे अॅड. अभिषेक अवचट, अॅड. सुनिल तनपुरे, अॅड. गणेश थोरात, अॅड. दिपक नागवडे, अॅड. आदित्य बारटक्के यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्जाचे कामकाज पाहिले. यामध्ये अॅड. अभिषेक अवचट यांचा युक्तिवाद ग्राह्यधरून सर्वोच्च न्यायालयाने आरोपी असलेल्या कुमार हरिश्चंद्र यादव यांचा जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे सदरचा जामीन अर्ज दाखल केल्यापासून १ महिन्यामध्ये निकाली काढण्यात आला असल्याचे अॅड. आदित्य बारटक्के यांनी सांगितले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.