Type Here to Get Search Results !

धायरी मधील दारुचे दुकान बंद करण्यासाठी उंबऱ्या गणपतीची महाआरती

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha

 

Maha aarti of Umbraya Ganapati to close liquor shop in Dhayari


 

पुणे, दि. ३ जून २०२५ (Checkmate Times): धायरी गावातील उंबऱ्या गणपती चौकातील दारुची दुकाने बंद करण्यासाठी धायरी ग्रामस्थांच्या वतीने रविवार दि.१ जून २०२५ रोजी प्रसिद्ध उंबऱ्या गणपतीची महाआरती  करण्यात आली. वाहतूक कोंडी, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारी दारूची दुकान बंद  होईपर्यंत श्रींची महा आरती सुरू ठेवण्याचा निर्धार सर्व पक्षीय ग्रामस्थांनी केला आहे. शासनाने कोरोना काळात सगळं बंद ठेऊन, शासनाला महसूल मिळतोय म्हणून दारूची दुकाने उघडी ठेवली होती. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग धायरी ग्रामस्थांच्या या मागणीकडे कसे पाहतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

या महाआरती आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा स्वाती पोकळे, महादेव पोकळे, अँड. राजेशाही मिंडे, सनी  रायकर, राजेश पोकळे, अरुण गायकवाड, ज्ञानेश्वर कामठे आदी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना स्वाती पोकळे यांनी म्हटले की, धायरी गावातील उंबऱ्या गणपती चौक येथे देशी व विदेशी दारू विक्रीचे दुकाने आहेत. सदर दुकान व त्या ठिकाणी होणाऱ्या अनिष्ट प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांना गंभीर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दारू पिणाऱ्या कुटुंबातील सदस्यांमुळे महिला वर्गाला याचा त्रास अधिक होतो आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना यामुळेच तर वाढीस लागत आहेत. अशावेळी आपल्या लाडक्या बहिणींच्या घरातील कौटुंबिक हिंसाचार कमी करण्यासाठी राज्यातील बहिणींचे भाऊ, पुण्याचे पालकमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामस्थांच्या या मागणीचा विचार करून दुकाने बंद करण्याचे आदेश देण्याबाबत विनंती केली आहे.

 

तर याबाबत बोलताना आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले की, दाट लोकवस्तीतील दारुच्या दुकानामुळे कायदा सुव्यवस्था, वाहतूक आदी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या विभागाच्या खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आदींना अनेक निवेदने देऊन देखील सरकारने दखल घेतली नाही. दुकाने बंद करण्यासाठी मतदान घेण्याची मागणी करुनही मतदान घेतले जात नाही. ड्राय डे च्या दिवशीही छुप्या पद्धतीने दारूची सर्रास विक्री होताना दिसते. अशावेळी किरकोळ कारवाई वगळता प्रशासन कोणतीही ठोस पावले उचलत नाही. या पार्श्वभूमीवर हि दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद करेपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचे बेन्कर यांनी म्हटले आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.