Type Here to Get Search Results !

कर्वेनगर वारजे मधील नागरिकांच्या सोयीसाठी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याची पीएमपीएमएल कडे महत्वपूर्ण मागणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


 

Shinde Sena worker makes important demand to PMPML for the convenience of citizens in Karvenagar Warje

 

आधार कार्ड शिबिराला देखील मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

पुणे, दि. ३० जून २०२५ (Checkmate Times): कर्वेनगर आणि वारजे भागातील प्रवासी नागरिकांच्या सोयीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे महाराष्ट्राचे समन्वयक अनिकेत जावळकर यांनी पीएमपीएमएल कडे एक महत्वपूर्ण मागणी केली आहे. या मागणीमुळे प्रवासी नागरिकांची मोठी सोय होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर पीएमपीएमएलच्या प्रवाशांमध्ये देखील वाढ होण्यास मदत होणार आहे.

 

अनिकेत जावळकर यांनी पीएमपीएमएलच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक असलेल्या नितीन नार्वेकर यांची भेट घेत आपली मागणी मांडली आहे. तर या मागणीच्या पुर्ततेमुळे पीएमपीएमएल आणि प्रवाशांचा कसा फायदा होणार आहे हे विषद केले आहे. त्यांच्या मागणीमध्ये त्यांनी प्रामुख्याने वारजे जुना जकात नाका अर्थात गालिंदे पथ येथे पीएमपीएमएलचे बस पास केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे. कर्वेनगर भागात मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत, त्याचबरोबर कर्वेनगर पासून वारजे पर्यंत वर्किंग वूमन्ससह विद्यार्थी विद्यार्थिनींची होस्टेल्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातच ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. मात्र या सर्वाना पीएमपीएमएल बसचा पास काढण्यासाठी गणपती माथा अथवा कोथरूडच्या बस स्थानकावर जावे लागते. यासाठी प्रवाशांना अधिकच खर्च करत तिकीट काढून या बस स्थानकांवर जावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो. यावर उपाय म्हणून वारजे जुन्या जकात नाक्यावर बस पास केंद्र पूर्ववत सुरु केल्यास, चालत जाऊन प्रवाशांना पास काढणे सुलभ होईल. या पार्श्वभूमीवर गालिंदे पथ बस थांब्यावर पास केंद्र सुरु करण्याची मागणी अनिकेत जावळकर यांनी केली आहे.

 


आधार कार्ड शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असताना नवीन आधार कार्ड काढणे आणि अठरा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर आपल्या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांच्या उज्वला भविष्याच्या वाटा सुखकर होण्यासाठी अनिकेत जावळकर यांच्या माध्यमातून नुकतेच आधार कार्ड शिबीर राबवण्यात आले. याचा शेकडो विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी फायदा घेतला. यामध्ये पत्त्यात बदल, वयात बदल, अगोदर झालेल्या चुकांमधील बदल अशा अनेक बदलांसह नवीन आधार कार्ड काढून देण्यात आले. भविष्यात असे लोकोपयोगी उपक्रम कार्यक्रम राबवत राहणार असल्याचे अनिकेत जावळकर यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.