Type Here to Get Search Results !

सिंहगड रोडवरच्या त्या गाड्या फोडण्याचे धक्कादायक कारण आले समोर; गुन्हे शाखेने संशयितांना घेतले ताब्यात

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha

 

Shocking reason behind smashing of cars on Sinhagad Road revealed; Crime Branch takes suspects into custody


 

पुणे, दि. ३० जून २०२५ (Checkmate Times): शनिवार दि. २८ जून २०२५ रोजी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर माणिकबागेत १५ ते २० चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. त्याचबरोबर मोहिते पॅराडाईज इमारतीतील अनलिमिटेड (वि मार्ट) दुकानाची अज्ञात इसमांनी तोडफोड केल्याने खळबळ उडाली होती. याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनच्या तपास पथकासह पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ चे पथक देखील या संशयितांच्या मागावर होते. दरम्यान गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने वेगवान हालचाली करत, संशयितांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाला यातील बहुतांशी संशयित सिंहगड पोलीस स्टेशनच्याच हद्दीत मिळून आले आहेत. तर त्यांच्या गाड्या फोडण्याचे कारण मात्र अचंबित करणारे ठरले आहे.

 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील कालवा रस्ता, वडगाव परिसरातील रस्ता, ई-लर्निंग स्कूलजवळील रस्ता, माणिकबाग आणि मुख्य सिंहगड रस्ता या भागात असलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हे काम केले असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले होते. यामध्ये सतरा गाड्यांच्या मालकांनी काचा फोडल्याच्या तक्रारी दिल्या होत्या. यानंतर पुणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पकंज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा १) विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा १) गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मधुकर तुपसौंदर, सहायक पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे, मुंकुद तारू, पोलीस हवालदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण, हनिफ शेख, अमोल काटकर, अतुल साठे, पोलीस शिपाई योगेश झेंडे, पुरुषोत्तम गुन्ला, तुषार किंद्रे, अक्षय गायकवाड, महिला पोलीस हवालदार अर्चना वाघमारे यांचे पथकाने सदर भागातील २५ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपितांची ओळख पटवुन गोपनिय बातमीदाराच्या मार्फतीने सहा जणांना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.

 


यामध्ये प्रथमेश मर्जुनाथ सौसुध्दी (वय २४ वर्ष) आणि श्रेयस नंदकुमार भागवत (वय १८ वर्ष दोघेही रा. माया अपार्टमेंट, वडगाव बुद्रुक, पुणे) आणि सुजय सतिश चव्हाण (वय १९ वर्ष, रा. केळेवाडी, वसंतनगर, कोथरूड, पुणे) यांच्यासह दोन वडगाव बुद्रुक आणि दत्तवाडी मध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन बालक हे त्यांच्या राहत्याघरी असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. यानंतर गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने त्यांचे राहतेघरी जावून शोध घेतला असता, बातमीतील व सीसीटीव्ही फुटेज मधील वर्णनाचे संशयित त्यांचे राहते घरी मिळुन आले. त्यांना ताब्यात घेऊन, गुन्हे शाखा युनिट ३ च्या कार्यालयात आणून, त्यांना विश्वासात घेत, त्यांच्याकडे दाखल गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. यानंतर त्यांची वैदयकिय तपासणी करुन, पुढील तपासकामी सिंहगड रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशी या तोडफोडीचे एक धक्कादायक कारण समोर आले आहे. यातील संशयितांची दुसऱ्या एका गटातील तरुणांशी पूर्वी भांडणे झाली होती. त्यांच्यामध्ये या तोडफोड झालेल्या भागात त्या रात्रीच्या वेळी समझोता करण्यात आला होता. मात्र मनामध्ये असलेला राग कोठेतरी काढायचा म्हणून या तरुणांच्या टोळक्याने एकामागे एक गाड्या फोडण्याचा दणका लावून दिला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच हे घटनास्थळावरून स्वारगेट आणि शहराच्या मध्यवस्तीत गेल्याचे गुन्हे शाखा युनिट ३ च्या तपासात पुढे आले आहे. तर यातील तिघे डिलिव्हरी बॉयचे काम करत असून, एकजण भाजी विक्रेता आहे तर दोघे जन शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

 

MLA Bhimrao Tapkir holds meeting at Sinhagad Road Police Station to demand strict action against vandals


तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या मागणीसाठी आमदार भिमराव तापकीर यांची बैठक

सिंहगड रस्त्यावर झालेल्या या तोडफोडीनंतर सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग, वडगाव बुद्रुक परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांनी माजी नगरसेवक हरिदास चरवड, भाजपा खडकवासला विधानसभा अध्यक्ष सचिन मोरे, यशवंत लायगुडे, विशाल उभे, वृषाली शेकदार, अमोल ठाकर, केदार नामजोशी, ईशान शहा आणि विजय गोमटे यांच्यासह सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्यासमवेत बैठक घेत कडक कारवाईची मागणी केली. यावेळी यशवंत लायगुडे यांनी मागील दोन महिन्यात अशा प्रकारच्या दोन घटना या भागात घडल्या आहेत त्यामुळे हद्दीमधील रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली.

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.