Type Here to Get Search Results !

नवले पुलावरून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशास लुटले; अवैद्य प्रवासी वाहनातून प्रवास करणे आले अंगलट

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


A passenger going to Kolhapur was robbed from the Navle bridge; The disabled passenger was forced to travel in a vehicle

 

 

पुणे, दि. ५ जून २०२५ (Checkmate Times): पुण्यातील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर असलेल्या नवले पुलावरून सातारा, कोल्हापूर आणि पुढे अगदी कर्नाटकात जाण्यासाठी प्रवासी वाहने मिळतात. यामध्ये सरकारी असलेल्या एसटी बस, खाजगी ट्रँव्हल्स आणि लहान खाजगी वाहनांमधून देखील अवैद्य प्रवासी वाहतूक केली जाते. मात्र अशाच एका अवैद्य प्रवासी वाहनातून प्रवास करणे एका कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशाला महागात पडले आहे. या प्रवाशाकडील २ हजार रुपये रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकुण ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अवैद्य प्रवासी वाहनचालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी जबरी चोरी करून नेला. याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम तपास करत आहेत.

 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.३० मे २०२५ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर हायवेवर असलेल्या स्वर्णा हॉटेल समोरील व्हिआरएल ट्रँव्हल्स वडगाव बुद्रुक येथुन ससेवाडी या प्रवासादरम्यान हि घटना घडली आहे. यातील फिर्यादी हे कोल्हापुर येथे जाण्यासाठी लाल रंगाची बलेनो गाडीमध्ये बसले असता, गाडी नवले ब्रिज वरुन थोडी पुढे गेल्यानंतर सदर गाडीतील नमुद चार अनोळखी इसमांनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी व लोखंडी हत्याराचे मुठीने मारहाण करुन त्यांना धाक दाखवून त्यांच्याकडील २ हजार रुपये रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकुण ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अवैद्य प्रवासी वाहनचालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी जबरी चोरी करून नेला. याबाबत २५ वर्षीय तरुणाच्या तक्रारीवरून सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये चार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम तपास करत आहेत.

 


काही दिवसांपूर्वीच अशाच पद्धतीने अवैद्य प्रवासी वाहनातून वारजे ते बावधन प्रवास करणाऱ्या प्रवाशास रिक्षाचालकाने त्याच्या साथीदारासह डुक्कर खिंडीजवळ लुटण्याची घटना घडली होती. याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरील आरोपीस शोधून काढण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले होते. मात्र या घटनांची वारंवारिता पाहता या अवैद्य प्रवासी वाहतुकीला कोण खतपाणी घालतंय? राजरोसपणे सुरु असलेली हि अवैद्य प्रवासी वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरु असते? या वाहनचालकांकडून दारू पिऊन महिला आणि मुलीना छेडछाड करण्याच्या अनेक घटना नेहमी घडत असतात. मात्र त्याकडे कानाडोळा का केला जातो? याबाबत कोणाचा पर्सनल इंटरेस्ट आहे? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसतात.

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.