Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. ५
जून २०२५ (Checkmate Times): नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात
असलेल्या आणि धायरी भागात राहणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पोलिसांनी एक वर्षासाठी
जालना येथील तुरुंगात स्थानबद्ध केले आहे. सदरील व्यक्ती अभिलेखावरील सराईत
गुन्हेगार असून, त्याने सन २०२४ पासून आपल्याजवळ घातक अग्नी शस्त्रे जवळ बाळगणे, दुखापत
करणे, मारामारी करणे, चोरी करणे यासारखे
गंभीर गुन्हे केले आहेत. त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा, त्याच्या
गुन्हेगारी कृत्यांमध्ये काहीएक सुधारणा झाली नाही. त्याच्या अशा गुन्हेगारी
कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याच्या
भितीमुळेनागरीक उघडपणे तक्रार देण्यास तयार होत नव्हते. त्याच्या या कृत्यांमुळे लोकांमध्ये
त्याची मोठी दहशत निर्माण झाली असल्याने त्याच्यावर एक वर्षासाठी स्थानबद्धतेची
कारवाई केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
साजन विनोद
शहा (वय १९ वर्षे,
रा. भैरवनाथ मंदिराजवळ, धायरी, पुणे) असे त्या एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्द करण्यात आलेल्या सराईत
गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार
शर्मा, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेश
बनसोडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त संभाजी कदम, सिंहगड
रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे, नांदेड
सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस
निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व्हेलन्स पथकाचे पोलीस
उपनिरीक्षक संतोष कदम, पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव यांनी एम.पी.डी.ए. प्रस्ताव
तयार करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचेकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाची पडताळणी
करून, नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरिल सराईत
गुन्हेगार साजन विनोद शहा यास एम.पी.डी.ए. कायदयान्वये एक वर्षे जालना कारागृह,
जालना येथे स्थानबध्द करण्याचा आदेश मंजूर करण्यात आला आहे.
आगामी काळात
नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सामान्य नागरिकांना त्रास होईल, कोणी कायदा
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल, वारंवार संधी देऊन देखील ज्यांनी आपल्या
वर्तणुकीत सुधारणा केली नसेल, अशा सर्वांची यादी तयार आहे. त्यांची गय केली जाणार
नाही. त्यांच्यावर एम.पी.डी.ए., मकोका अशा कडक कायदेशीर कारवाई केल्या जाणार
असल्याचा कडक इशाराच नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस
यांनी दिला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share