Type Here to Get Search Results !

वारजे हद्दीतील मोक्काच्या गुन्ह्यात ७ महिन्यांपासून फरार असलेल्या टोळक्यामधील एकाला गुन्हे शाखेने केले जेरबंद

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


Crime Branch arrests one of the gang members who was absconding for 7 months in connection with the crime of Mokka in Warje area

 

 

पुणे, दि. ५ जून २०२५ (Checkmate Times): कर्वेनगर मधील हॉटेल चंद्रलोक गार्डन बियर बार परिसरात ७ महिन्यांपूर्वी एका २० ते २२ जणांच्या टोळक्याने जोरदार हैदोस घालत तीन जणांना बेदम मारहाण केली होती. यानंतर वारजे पोलीस स्टेशन मध्ये सदरील टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आतापर्यंत जवळपास ८ जणांना अटक करण्यात आली होती, तर ६ अल्पवयीनांना बाल न्याय मंडळापुढे सादर केले होते. दरम्यान फरार असलेल्या ६ ते ७ संशयितांपैकी एकाला अटक करण्यात पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलीस पथकाला यश आले आहे.

 

 

रोहन राजेश धिवार (वय २२, रा. वडगाव धायरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सदरील गुन्हा घडल्यापासून वारजे पोलिसांच्या तपास पथकासह, पुणे शहर पोलीस दलातील विविध पथके या टोळीतील फरारी असलेल्या संशयितांच्या मागावर होती. दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस अंमलदार अमित बोडरे आणि चेतन शिरोळकर यांना त्यांच्या गोपनीय बामतीदारामार्फत बातमी मिळाली की, या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी रोहन धिवार हा स्वारगेट एसटी स्टँड जवळ आला आहे. यानंतर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, परि. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील हंस, सुरेश पाटील, पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अमित बोडरे, किशोर दुशिंग, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे, भाग्यश्री वाघमारे व चालक सुजीत पवार यांच्या पथकाने स्वारगेट एसटी स्टँड परिसरात सापळा रचून रोहन धिवार याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. यावेळी त्याची वैदयकीय तपासणी करुन पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात प्रतिक भोकरे, रोहित रहाटे, नितीन जमादार यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता, अ‍ॅल्युमिनियम पाईप, पेव्हिंग ब्लॉकने बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली होती. पोलिसांनी या गुन्ह्यातील सोहम विजय आवटी (वय २० वर्षे, रा. कर्वेनगर, पुणे), चिन्मय संतोष उत्तेकर (वय २० वर्षे, रा. कर्वेनगर, पुणे), गणेश ऊर्फ (छोटा गणा) तुळशीराम पवार (वय २१ वर्षे, रा. नांदेड गाव, पुणे), ओमकार रवि राठोड (वय १८ वर्षे, ०२ महिने, रा. नऱ्हे गाव, पुणे), रोहित चंदर खेतावत (राठोड) (वय १८ वर्षे, ०५ महिने, रा. कर्वेनगर, पुणे), रवि मधूकर जाधव (वय २६ वर्षे, रा. वडगाव बु. पुणे), अश्विन उर्फ बारक्या बाळकृष्ण लोणारे (वय २० वर्षे, रा. धायरी, पुणे) आणि रितेश प्रकाश कदम (वय २१ वर्षे, रा. आंबेगाव बु. पुणे) यांना अटक केली होती. तर आता रोहन राजेश धिवार (वय २२, रा. वडगाव धायरी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तर यातील आणखीन ६ ते ७ संशयित अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीची कर्वेनगरमध्ये दहशत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मकोका कारवाई केली होती. या टोळीतील रोहन धिवार हा तेव्हापासून फरार होता.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.