heckmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. १०
जून २०२५ (Checkmate Times): वारजे माळवाडी आणि तपोधाम परिसरात गाड्या फोडल्याच्या
दोन घटनांनी वारजे मध्ये चर्चांना उधाण आले आहे. यामधील एका गुन्ह्यातील संशयिताना
वारजे पोलिसांनी गजाआड केले आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यातील संशयितांचा शोध सुरु
असल्याचे दिसते. वारजे तपोधाम मध्ये घडलेली घटना शनिवार दि.७ जून २०२५ सायंकाळी
घडली आणि त्यात समोरासमोर घटना घडल्याने हल्लेखोरांना अटक करण्यात आली. मात्र
वारजे माळवाडी मधील सिप्ला कॅन्सर रुग्णालय रस्त्यावर घडलेली दुसरी घटना रविवार
दि.८ जून २०२५ सकाळी उघडकीस आली. यातील संशयितांचा वारजे पोलीस शोध घेत आहेत.
पहिल्या
घटनेत दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने गुंडाच्या टोळक्याने टेम्पोची काच फोडून
चालकाला मारहाण करुन त्याच्या खिशातील पैसे काढून घेतले. त्याचा जाब विचारल्यावर टेम्पोमालक
व त्यांच्या मुलगा भाचा यांच्या डोक्यात बीअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले.
त्यांच्या खिशातील रोकड,
सोन्याची चैन, मोबाईल असा माल जबरदस्तीने
काढून घेतली. याबाबत रफिक मोहम्मद मणियार (वय ५४, रा. सुरभी
कॉलनी, वारजे माळवाडी, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन
मध्ये दिलेल्या तक्रारीवरून आशितोष नारायण साठे (वय २२ वर्षे, रा.मु. कुळे ता. मुळशी, जि.पुणे), ओम सचिन वनकुद्रे (वय १९ वर्षे, रा. गृहलक्ष्मी अपार्टमेंट, तपोधाम सोसायटी वारजे, पुणे), सुमित दिपक तावडे (वय २० वर्षे, रा. दांगट पाटीलनगर कमान नं.१, वारजे पुणे), वेदांत राजेंद्र भास्कर (वय २४ वर्षे रा.दांगट अपार्टमेंट, नऱ्हे, पुणे) आणि पॉलजेरॉल्ड फर्नाडीस (वय २९ वर्षे, रा.हनुमान मंदिर, पवार बिल्डिंग, वारजे पुणे) अशा ५ जणांना अटक केली
आहे. पोलिसांनी त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार तपोधाम परिसरात ७ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडला. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे तपास करत आहेत.
याबाबत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मणियार यांचे भंगाराचे दुकान
आहे. त्यांच्या दुकानातील कामगार गोविंदकुमार हा टेम्पो घेऊन त्याच्या घरी जात
होता. त्यावेळी रस्त्यामध्ये आरोपींने त्यांना अडविले. त्यांच्याकडे दारु
पिण्यासाठी पैशांची मागणी केली. तेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा
आरोपींनी त्यांच्या टेम्पोची काच दगडाने फोडून त्यांना बाहेर ओढून हाताने मारहाण
केली. त्यांच्या खिशातील दोनशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकाराची माहिती
त्यांनी मालक मणियार यांना दिली. मणियार व त्यांची मुले शाहिद, अमन व भाचा राहिल मणियार हे तेथे गेले. त्यांनी आरोपींना आमच्या गाडीची
काच का फोडली, असे विचारल्यावर त्यांनी शाहिद याच्या डोक्यात
बिअरची बाटली फोडून जखमी केले. राहिल याला कोणत्यातरी वस्तूने हाताने मारुन जखमी
केले. त्यांच्यातील दोघांनी रफिक मणियार यांना पकडून धाक दाखवून त्यांच्या खिशातील
पाचशे रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. शाहिदच्या गळ्यातील सोन्याची चैन असा
एकूण ४५ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. त्यांच्यातील एकाने “मी आशितोष साठे या
भागातील भाई असून तुला इथे धंदा करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल,
असे म्हणून हत्यार हवेत फिरवुन, आम्ही इथले भाई असून आमच्यामध्ये
कोणी आले तर एक एकाला खल्लास करुन टाकीन,” अशी धमकी देऊन
परिसरात दहशत पसरविली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तर वारजे
माळवाडी मधील सिप्ला कॅन्सर रुग्णालय रस्त्यावर, व्हायोला सोसायटी समोर असलेल्या
एका मोकळ्या जागेत झाडाखाली, सावलीला लावण्यात आलेल्या दोन स्कॉर्पिओ, एक वॅगन
आरच्या काचा अज्ञातांनी दगड, कोयते, बांबू सदृश हत्यारांनी फोडले आणि एका दुचाकीचे
नुकसान केले असल्याचे उघडकीस आले. याबाबत गाडी मालकांनी वारजे पोलिसात तक्रार दिली
असून, यातील संशयितांचा मात्र अद्याप ठावठिकाणा लागला नसल्याचे पोलिसांकडे
केलेल्या चौकशीवरून समोर आले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share