Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आढावा बैठक
पुणे, दि. २५
जुलै २०२५ (Checkmate Times): वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन
आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा, असे निर्देश उच्च
आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत. तसेच, वाहतूक
कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक्तेनुसार सीसीटीव्ही आणि एआय चलानची संख्या वाढवा,
अशी सूचना ही त्यांनी बैठकीत केली. कोथरुडमधील वाहतूक कोंडीची
समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार असल्याचे पाटील यांनी यापूर्वीच
जाहीर केले होते. त्यानुसार आज पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समवेत वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांची माहिती
घेऊन, त्यांनी या सूचना केल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या या कृतीसातत्यामुळे
आगामी काळात कोथरूड वाहतूक कोंडी मुक्त होईल असे आश्वासक चित्र निर्माण व्हायला
लागले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
यावेळी
वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे
अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे संदीप खलाटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर,
प्रकाश बालवडकर, माजी नगरसेवक दीपक पोटे,
भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड दक्षिण
मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, अजय मारणे, डॉ. संदीप बुटाला यांच्यासह पदाधिकारी
कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या
सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्तानुसार झालेल्या कारवाईचा आढवा पाटील यांनी
घेतला. त्यामध्ये ५० वॅार्डन नियुक्तीबाबत काय कारवाई केली असा, सवाल
पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक शाखेकडून आश्वस्त करण्यात आले आहे. यासोबतच वाहतूक कोंडी
होणाऱ्या भागात काय उपाययोजना केल्या याचीही विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली.
त्यावर वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांची पाहाणी करून, आवश्यकतेनुसार
वाहतूक पोलीसांची नियुक्ती केली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
या बैठकीत
सीसीटीव्हीचा मुद्दा ही चर्चेत आला. त्यावर पाटील यांनी वाहतूक विभागाने
कोथरुडमध्ये कुठे कुठे सीसीटीव्ही लावण्याची आवश्यकता आहे, याची
पाहणी करावी, लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित करु असे
आश्वस्त केले. त्यासोबतच आवश्यकतेनुसार एआय बेस चलान प्रणालीचाही अवलंब करावा,
असेही सूचित केले. वाहतूक कोंडी मुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन,
ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करावे, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करु, अशी ग्वाही
त्यांनी यावेळी वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांना दिली. दरम्यान, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी याच आठवड्यात
बैठक घेणार असून, विभागाने मागील बैठकीच्या इतिवृत्तावर
कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

.webp)