Type Here to Get Search Results !

वारजे मधील मोक्का गुन्ह्यात दोन महिन्यांपासून फरार असलेल्या टोळी प्रमुखाला पकडण्यात पोलिसांना यश

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


 

Police succeed in arresting gang leader who was absconding for two months in Mokka crime case in Warje


खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

पुणे, दि. २९ जुलै २०२५ (Checkmate Times): वारजे मधील एका मोक्काच्या गुन्ह्यात जवळपास दोन महिन्यांपासून फरार असलेल्या टोळी प्रमुखाला पकडण्यात पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. याच्या पाच साथीदारांना अगोदरच अटक करण्यात आले होते. तर आज ज्या टोळी प्रमुखाला पकडले, त्याच्यावर यापूर्वीचा देखील आणखीन एक मोक्काचा गुन्हा दाखल असून, त्यामध्ये त जामिनावर आहे. दरम्यान यात अटक केलेल्यांची घटना घडलेल्या ठिकाणी वारजे पोलिसांच्या तपास पथकाने वरात काढत, नागरिकांच्या मनातून त्यांची दहशत कमी करण्याचा प्रयत्न देखील केला होता.

 




याबाबत पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक १ च्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, आज दि. २९ जुलै २०२५ पोलीस हवालदार बाला रफी शेख यांना त्यांच्या खात्रीशीर बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे आणि पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, तो त्याच्या मावशीकडे, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड येथे पत्नीसह राहत असलेबाबत बालारफि शेख यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती. यावरून पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, पोलीस अंमलदार नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, बाला रफिक शेख, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, नितीन बोराटे यांच्या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी सापळा रचला. सदर ठिकाणी शोध घेत असताना, त्याचे मावशीचे घराबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

 




वैभव शांताराम उकरे (वय २६ वर्षे, रा. वडार वस्ती, कर्वेनगर, पुणे) असे त्याचे नाव असून, वारजे मधील तपोधाम परिसरात या टोळक्याने दहशत पसरवण्याचे काम केले होते. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने गुंडाच्या टोळक्याने टेम्पोची काच फोडून चालकाला मारहाण करुन त्याच्या खिशातील पैसे काढून घेतले होते. त्याचा जाब विचारल्यावर टेम्पोमालक व त्यांच्या मुलगा, भाचा यांच्या डोक्यात बीअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले होते. त्यांच्या खिशातील रोकड, सोन्याची चैन, मोबाईल असा माल जबरदस्तीने काढून घेतली हती. याबाबत रफिक मोहम्मद मणियार (वय ५४, रा. सुरभी कॉलनी, वारजे माळवाडी, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून आशितोष नारायण साठे (वय २२ वर्षे, रा.मु. कुळे ता. मुळशी, जि.पुणे), ओम सचिन वनकुद्रे (वय १९ वर्षे, रा. तपोधाम सोसायटी, वारजे, पुणे), सुमित दिपक तावडे (वय २० वर्षे, रा. दांगट पाटील नगर, वारजे, पुणे), वेदांत राजेंद्र भास्कर (वय २४ वर्षे रा. नऱ्हे, पुणे) आणि पॉलजेरॉल्ड फर्नाडीस (वय २९ वर्षे, रा. वारजे, पुणे) अशा ५ जणांना अटक केली होती. तर वैभव उकरे हा घटना घडल्यापासून फरार झाला होता. पोलिसांनी या टोळीवर दरोड्यासह मोक्काचा गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार तपोधाम परिसरात ७ जून २०२५ रोजी सायंकाळी साडे सात वाजता घडला होता.

 




याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मणियार यांचे भंगाराचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातील कामगार गोविंदकुमार हा टेम्पो घेऊन त्याच्या घरी जात होता. त्यावेळी रस्त्यामध्ये आरोपींने त्यांना अडविले. त्यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. तेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा आरोपींनी त्यांच्या टेम्पोची काच दगडाने फोडून त्यांना बाहेर ओढून हाताने मारहाण केली. त्यांच्या खिशातील दोनशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकाराची माहिती त्यांनी मालक मणियार यांना दिली. मणियार व त्यांची मुले शाहिद, अमन व भाचा राहिल मणियार हे तेथे गेले. त्यांनी आरोपींना आमच्या गाडीची काच का फोडली, असे विचारल्यावर त्यांनी शाहिद याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले. राहिल याला कोणत्यातरी वस्तूने हाताने मारुन जखमी केले. त्यांच्यातील दोघांनी रफिक मणियार यांना पकडून धाक दाखवून त्यांच्या खिशातील पाचशे रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. शाहिदच्या गळ्यातील सोन्याची चैन असा एकूण ४५ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. त्यांच्यातील एकाने “मी आशितोष साठे या भागातील भाई असून तुला इथे धंदा करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल, असे म्हणून हत्यार हवेत फिरवुन, आम्ही इथले भाई असून आमच्यामध्ये कोणी आले तर एक एकाला खल्लास करुन टाकीन,” अशी धमकी देऊन परिसरात दहशत पसरविली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 


 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.