Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. ३१
जुलै २०२५ (Checkmate Times): वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी
रस्त्यावरून सहभागी होणारे अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
ट्रस्ट हे जगभरातील गणेशभक्तांसाठी मुख्य आकर्षण असते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई
गणपती आणि अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे विसर्जन मिरवणुकीत दर्शन घेणे हे
पुणेकरांच्या दृष्टीने क्रमप्राप्त आहे. या दोन गणपतींच्या विसर्जनानंतर विसर्जन
मिरवणुका पहायला आलेली गर्दी कमी होत असल्याचा अनुभव आले. मात्र यावर्षीपासून
सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता, मानाचे पाच गणपती टिळक
पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय अखिल
मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या दोन्ही मंडळांनी घेतला
आहे. त्यामुळे गणेशभक्तांना हा एक मोठा धक्का आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तर हि दोन महत्वाची मंडळे लवकर बाहेर पडल्यामुळे विसर्जन मिरवणुका लवकर संपतील असा
कयास लावला जात आहे.
याविषयी
माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेला अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा
थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत
बालन, अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई
मंडळाचे संजय मते, विश्वास भोर आदी उपस्थित होते.
यावेळी
बोलताना अण्णा थोरात म्हणाले की, गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून, संपूर्ण
दहा दिवस त्याचे महत्व आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे विसर्जन.
यावर्षी अनंत चतुदर्शी शनिवार दि.६ सप्टेंबर २०२५ रोजी आहे. तर त्याच्या दुसऱ्या
दिवशी रविवार दि.७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण असल्याने ग्रहणकाळात
देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे दुपारी १२ पूर्वी
मंडळाच्या मूर्ती मंदिरात पुन्हा येणे आवश्यक्य आहे. मागील तीन वर्षे पोलिसांनी
दिलेल्या वेळेस सायंकाळी ७ वा श्रींची आरती करून मिरवणुकीत सामील होण्यासाठी तयार
असतो. पण गेली काही वर्षे पोलिस प्रशासनाने शब्द पाळला नाही. त्यामुळे सायंकाळी
मिरवणुकीत सामील होण्यासाठी आम्ही तयार असूनही आम्हाला वेळेवर सहभागी करून घेण्यात
आलेले नाही. त्यामुळे यंदा आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांनी यंदा
मिरवणूक रविवारी दुपारी १२ पूर्वी संपवावी असे आवाहन देखील आण्णा थोरात यांनी
यावेळी केले आहे.
तर श्रीमंत
भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे पुनीत बालन म्हणाले की, ग्रहणकाळ
रविवारी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी सुरु होत आहे. किमान त्याआधी अर्धा तास सर्व
गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती मंदिरात नेणे आवश्यक आहे. याकरिता मिरवणूक लवकर
संपविणे आवश्यक असून, आम्ही मानाचे पाच गणपती टिळक पुतळा चौकातून मार्गस्थ
झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. सर्व गणेशमंडळांनी देखील
याबाबत सहकार्य केल्यास पोलिस आणि प्रशासना यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
एकूणच या दोन मंडळानी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून, त्याचे अनुकरण इतर मंडळानी
करणे तितकेच गरजेचे असल्याचे समोर येते आहे. त्याचबरोबर यावेळी पुनीत बालन यांनी स्पीकर
बाबत घेतलेल्या निर्णयाचे देखील पुणेकरांनी स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर या
दोन्ही मंडळांच्या या निर्णयाचे पुणेकर कसे स्वागत करतात आणि इतर मंडळे विशेषतः
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे सुवर्णयुग मित्र मंडळ यावर आता आपली भूमिका कशी
घेते याकडे पुणेकरांचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

