Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
नांदेड सिटी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट ३ ची संयुक्त कारवाई
पुणे, दि. २ जुलै
२०२५ (Checkmate Times): भरदिवसा बंदुकीच्या धाकाने वडगाव बुद्रुक येथील सराफी
पेढी लुटल्याचा प्रकार समोर आला होता. दुचाकीवर तोंडाला मास्क लावून आलेल्या
तिघांनी येथील गजानन ज्वेलर्समध्ये घुसून महिलेला मारहाण करत शस्त्राच्या धाकाने
पाच सोनसाखळी आणि एक नेकलेस असा पाच तोळे सोन्याचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून पळ
काढला होता. यानंतर नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे डीबी पथक आणि गुन्हे शाखा युनिट ३ च्या
पथकांनी तातडीने संयुक्त कारवाई करत, त्यांच्यातील एकाला वारजे पोलीस स्टेशनच्या
हद्दीतून ताब्यात घेतले आहे.
मंगळवार दि.१
जुलै २०२५ दुपार दीडच्या सुमारास सदरील घटना घडली होती. गजानन ज्वेलर्स, रेणुकानगरी,
बडगाव बु. पुणे या दुकानात दोन अनोळखी चोरट्यांनी दुकानात प्रवेश
करुन, गुलाबी रंगाचे जॅकेट घातलेल्या चोरटयाने ज्वेलर्सच्या मालकाच्या
दिशेने पिस्तुल रोखुन, काळे रंगाचे जॅकेट घातलेल्या
चोरट्याने त्याचेकडील लोखंडी हत्याराने जिवे ठार मारणेसाठी फिर्यादी मंगल शंकर
घाडगे (वय ५५ वर्ष, रा. सदाशिव दांगट नगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांच्या डोक्यात व डावे हाताचे दंडावर वार करून,
गंभीर जखमी करुन, दुकानाचे कपाटाचे काचा
लोखंडी हत्याराने फोडुन, कपाटामधील ५० ग्रॅम वजनाचे ४ लाख ५०
हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दरोडा टाकुन, जबरदस्तीने
चोरुन नेले. सदरचे दोन्ही चोरटे त्यांचे रोडवर उभा असलेल्या साथीदाराचे
मोटरसायकलवर बसुन, पळुन जातेवेळी त्यांचे हातामधील पिस्तुल व
लोखंडी हत्यार हवेत फिरयत लोकांमध्ये दहशत करीत निघुन गेले होते. त्याचे चित्रण एका
चारचाकी गाडीच्या डॅश कॅमेऱ्यात कैद झाले होते. याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये
गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर
गुन्ह्याचा नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे तपास पथक (डीबी) आणि पुणे शहर पोलिसांच्या
गुन्हे शाखा युनिट ३ च्या माध्यमातून समांतर तपास चालू करण्यात आला होता. दरम्यान जबरी
चोरी करुन जाणारे चोरट्यांचे गाडीवरील डॅश कॅमेऱ्यात झालेल्या सीसीटीव्ही फुटेज
मधील फोटोच्या आधाराने तपास करत असताना, नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या पोलीस शिपाई
स्वप्निल मगर,
प्रतिक मोरे आणि गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलीस शिपाई पुरुषोत्तम
गुन्ला यांना त्यांच्या गोपणीय बातमीदारामार्फत फोटो मधील गाडी चालवणारा तरुण वारजे
कर्वेनगर सीमेवरील आंबेडकर चौक येथे थांबला असल्याची माहीती प्राप्त झाली. यावेळी
क्षणाचाही विलंब न करता, सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस
शिपाई स्वप्निल मगर, प्रतिक मोरे पुरूषोत्तम गुन्ला यांनी
माहिती मिळालेल्या ठिकाणी धाव घेत, त्या तरुणाला घेरून, त्याला ताब्यात घेतले.
त्याला ताब्यात
घेऊन, विश्वासात घेत चौकशी केली असता, त्याने त्याचा नाव पत्ता कथन केला.
त्याचबरोबर गुन्ह्याची कबुली देत, त्याच्या साथीदारांची नावे सांगितली आहेत.
यामध्ये तो अल्पवयीन असल्याचे समोर आले असून, उत्तमनगरचा रहिवासी असल्याचे तपासात समोर
आले आहे. तर त्याचे साथीदार सिंहगड रोड आणि इतरत्र राहत असल्याचे देखील समोर आले
आहे. त्याह्बरोबर या गुन्ह्याच्या प्लॅनरचे नाव देखील समोर आले असून, तिघांचाही
शोध पुणे शहर पोलिसांच्या विविध पथकांकडून घेण्यात येत आहे. मात्र कोणताही ठोस सुगावा
नसताना देखील आपल्या गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून बातमी मिळवत ५ तासांच्या आत
एका संशयिताला ताब्यात घेण्यात नांदेड सिटी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट ३ च्या
पथकाला आलेले यश कौतुकास्पद आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सदरची कारवाई
अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, परिमंडळ ३ चे पोलीस
उपआयुक्त संभाजी कदम,
सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांचे
मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे, युनिट
३ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलीस
निरीक्षक राहुल यादव, ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे, पोलीस शिपाई स्वप्नील
मगर, प्रतिक मोरे, संग्राम शिनगारे,
राजु वेगरे, शिवाजी क्षिरसागर, मोहन मिसाळ, अक्षय जाधव, निलेश
कुलथे, उत्तम शिंदे, निलेश खांबे,
सतिश शेत, पंढरीनाथ शिंदे, कैलास लिम्हण, किशोर शिंदे, अतुल
साठे, पुरूषोत्तम गुन्ला, तुषार
किंद्रे यांच्या पथकाने केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

