Type Here to Get Search Results !

माऊलींचे पसायदान आणि तुकारामांचे अभंग हीच साहित्याची जन्मभूमी: वि. दा. पिंगळे

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


Mauli's Pasayadan and Tukaram's Abhang are the birthplace of literature: V. Da. Pingle The poets' conference organized by Rajiv Patil was performed by the elders


 

राजीव पाटील आयोजित कविसंमेलन ज्येष्ठांनी रंगवले

 

पुणे, दि. १ जुलै २०२५ (Checkmate Times): मराठी साहित्यामध्ये कवितेची परंपरा खूप मोठी आहे. कविता ही फक्त त्या कवीचे जगणे नसते, तर कवी हा नेहमी समाजाचे समकालीन मूल्य पकडतो, समाजाचे वास्तव मांडत असतो. कवितेचे प्रयोजन कविच्या आत्म सुखापेक्षा समाजाचे प्रबोधन व्हावे हे असले पाहिजे, म्हणून कविताही नेहमीच परिवर्तन आणि प्रबोधनाला जन्म देत असते. त्यामुळेच संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान, अभंग आणि संत तुकारामांचे अभंग आजही समाज मनाला आपले वाटतात आणि हीच साहित्याची जन्मभूमी असल्याच्या भावना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी व्यक्त केल्यात. श्री पावशा गणपती जेष्ठ नागरिक संघ वारजे आणि राजीव पाटील सोशल अँड चॅरिटेबल फाउंडेशन आयोजित कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पिंगळे बोलत होते.

 


या कवी संमेलनामध्ये वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे भागातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे जेष्ठ नागरिक कवी व कवयित्री सहभागी झालेले होते. आपले अनुभव, आयुष्यातील संघर्ष त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना पिंगळे म्हणाले की, समाजाच्याच विशाल वटवृक्षाला साहित्याची नक्षत्रफुले येत असतात. ही नक्षत्रफुले समाजाला अधिक समृद्ध करीत असतात. ज्येष्ठ नागरिक हे अनुभवांचे विद्यापीठ असतात. ज्या घरात आणि समाजात ज्येष्ठांचा आदर केला जातो, ते घर आणि समाज सुसंस्कृत म्हटले जाते. ज्येष्ठांच्या अनुभवांचा फायदा नव्या पिढीने घ्यायला हवा. तुमचे अनुभव हे संघर्षातून समृद्धीकडे आलेले असतात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

 


याप्रसंगी पावश्या गणपती जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मुरलीधर रायबागकर, प्राचार्य नंदकिशोर बोधाई, दिगंबर जोशी, मुरलीधर रायबागकर, सुभाष कुलकर्णी, उत्तम दिकत्तवार, विनीता दापोरकर, बाळासाहेब पानसे, दत्तात्रय पायगुडे, अशोक शहा, चंद्रशेखर धर्माधिकारी, स्मिता जोशी, रत्नाकर वडुदकर, शामला जोशी, रजनी नांदोडे, तृप्ती तिकोने यांच्यासह ज्येष्ठ कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. याप्रसंगी वारजे भागातील सामाजिक कार्यकर्ते दत्ता झंजे, पत्रकार महादेव पवार, प्रदीप बलाढे, देविदास शेट्टी, निलेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.