Type Here to Get Search Results !

विकासकामाच्या श्रेयावरून भाजपा राष्ट्रवादी मध्ये वाद; माजी नगरसेवकासह भावावर गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, checkmate news, chekmet news 

RMD College to Sai Sayaji Nagar walk way

पुणे, दि. 23 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): खडकवासला विधानसभा मतदार संघाचे (Khadakwasla Vidhansabha) आमदार भिमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांच्या निधीमधून सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी अडथळा आणून शिवीगाळ दमदाटी केल्याबाबत भाजपाच्या ओबीसी आघाडीचे (BJP OBC Cell Pune) पुणे शहर सरचिटणीस वासुदेव शिवाजी भोसले (वय. ४५ वर्ष, रा. राजयोग सोसायटी, वारजे, पुणे)  (Vasudeo Shivaji Bhosale) यांच्या फिर्यादीवरून वारजे मधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दोडके (Sachin Dodke) आणि त्यांचा भाऊ संजय दोडके (Sanjay Dodke) यांच्यासह त्यांच्या ५ ते ६ कार्यकर्त्यांवर वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Shitole Heights Warje Karvenagar Pune


 


फिर्यादी वासुदेव भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवार दि. 21 मार्च 2023 सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वारजे मधील आरएमडी कॉलेज (RMD College Warje Malwadi Pune) ते साई सयाजी नगर (Sai Sayaji Nagar) यांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे (Subway) आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून काम चालू आहे. या ठिकाणी सचिन दोडके, संजय दोडके आणि त्यांचे इतर कार्यकर्त्यांनी फिर्यादींना शिवीगाळ करून, संजय दोडके यांनी हातात बांबू घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात, जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर तिथे काम करत असलेल्या कामगारांना सुद्धा मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे.

 


याबाबत काल बुधवार दि. 22 मार्च 2023 दुपारी आमदार तापकीर यांनी खडकवासला विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या सर्वच्या सर्व माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, अल्पना वरपे, राजाभाऊ बराटे, वृषाली चौधरी, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, वर्षा तापकीर, राणी भोसले, अरुण राजवाडे, खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष सचिन मोरे, सुभाष नाणेकर, मारुती किंडरे, सहकार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सचिन दशरथ दांगट, किरण बारटक्के, सचिन विष्णूपंत दांगट, सचिन बदक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह वारजे पोलिस स्टेशन मध्ये सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांची भेट घेत, संबंधित नगरसेवकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. सदरील काम आपल्या निधीमधून होत असल्याचा दावा आमदार तापकीर यांनी यावेळी केला आहे.

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.