Type Here to Get Search Results !

चोरीच्या पैशांतून 5 एकर शेती, 3 फ्लॅट आणि घेतलं बरंच काही

 


पुणे दि.१४ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : सोलापूर शहरात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या चोरांची संपत्ती पाहून पोलिसही थक्क झाले. 

कर्नाटक राज्यात चोरी, मारामारी, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, दरोडा असे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेले दोन चोर गेले दीड वर्ष सोलापुरात आले आणि इथेच ते राहू लागले. शहरात फिरुन दिवसभर रेकी करायची आणि रात्री चोरी करायची अशी त्यांची मोडस ऑपरेंडी होती. शहरात दहा ठिकाणी त्यांनी चोरी केली होती. पण पोलिसांच्या तावडीतून ते सुटु शकले नाहीत. पोलिसांनी त्यांच्या नजर ठेवत अखेर त्यांना अटक केली. उमेश खेत्री आणि सुरेश सासवे अशी अटक करण्यात आलेल्या या दोन अट्टल चोरांची नावं आहेत. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दहा गुन्हे केल्याची कबूली दिली.

पोलिसांनी उमेश आणि सुरेश यांच्याकडून  ९ लाख १ हजार ९८० रुपये रोख आणि १३७ ग्राम सोन्याचे दागिने असे एकूण २५ लाख ९३ हजार ३५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पण त्यांच्या चौकशीत पोलिसांना जी माहिती मिळाली ती हैराण करणारी होती. उमेश खेत्री याने चोरीच्या पैशातून आपल्या नातेवाईकांच्या नावाने चुंगी इथं तीन एकर आणि संजवाड इथं दोन एकर अशी पाच एकर शेतजमीन घेतली आहे. शिवाय मुळेगाव इथं तीन प्लॉट त्याच्या नावावर आहेत. तसंच दोन दुचाकी आणि दोन कारही त्याच्याकडे आहेत. ४४ लाख २ हजार रुपये किमतीचे जमीन, रोकड,दागिन्यांसह २५ लाख ९३ हजार ३५७ रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. एक आरोपी दिवसभर शहरात बंद घरांची रेकी करत असते त्यानंतर उमेश खेत्री रात्री जाऊन चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.