Type Here to Get Search Results !

प्रेयसीचा खून करून प्रियकर पसार; दुसऱ्या प्रेयसीला घेऊन पोहोचला नागपुरात

 


पुणेदि. जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेमीयुगुलात भांडण झाले. त्यातून प्रेयसीचा खून करून प्रियकर पसार झाला. दुसऱ्या प्रेयसीला घेऊन तो नागपुरात पोहोचला. त्याच्या मागावर असणाऱ्या पुणे पोलिसांनी याबाबत नागपूर पोलिसांना सूचना दिली. लागलीच आरोपी व त्याच्या प्रेयसीला पोलिसांनी शंकरनगरातील बोले पेट्रोलपंपाजवळून ताब्यात घेतले. दोघांनाही पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

आशीष भोसले (वय २० रा. सासवड, पुरंदर, पुणे) असे प्रेयसिच्या मारेकऱ्याचे नाव आहे. कीर्ती देढेकर (वय २०, रा. हिंजवड) असे मृत प्रेयसीचे नाव आहे. दोघेही लव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान मूळची नागपूरच्या कोराडीत राहणाऱ्या युवतीसोबतही त्याचे सूत जुळले. याच कारणावरून आशीष आणि कीर्ती यांच्यात वाद सुरू झाला. १९ जुलैला आशिषने कीर्तीचा गळा आवळून खून केला. ही घटना २० जुलैला उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी गतीने तपासचक्र फिरवीत आरोपी आशिषचा शोध सुरू केला होता.

मृतक कीर्ती हिंजवडमध्ये कपड्याच्या दुकानात कामाला होती. सुमारे दीड वर्षांपूर्वी तिथेच काम करणाऱ्या आशिषवर प्रेम जडले. कीर्तीच्या घरच्यांचा दोघांच्या लग्नाला विरोध होता. यामुळे ९ महिन्यांपूर्वीपासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. नागपूरच्या दुसऱ्या प्रेयसीची बहिणसुद्धा पुण्यातीलच एका कपड्याच्या शोरुममध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. तिने धाकट्या बहिणीला कीर्ती व आशिष कार्यरत असलेल्या कपड्याच्या दुकानातच नोकरी लावून दिली. दरम्यान, आशिष व नागपूरच्या युवतीमध्येही प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत शंका निर्माण होताच कीर्तीने तिच्या व आशिषच्या संबंधांची स्पष्ट माहिती दिली. याच मुद्यावरून आशिष व कीर्ती यांचे संबंध टोकाला गेले. त्यानंतर नागपूरची युवती घरी परतली.

कीर्तीच्या खुनानंतर आशिष मुंबईला पळून गेला. तिथून नागपूरच्या प्रेयसीला फोन केला. कीर्तीने आत्महत्या केल्याची बतावणी केली. आता दोघे लग्न करुन सोबत राहण्याची तयारी दर्शविली आणि तिला मुंबईत येण्यास तयार केली. त्यानुसार दुसरी प्रेयसी मुंबईत पोहोचले. तिथून दोघांनीही नागपूर गाठले. पुणे पोलिसांकडून सतत आरोपीच्या मोबाईल लोकेशनवर लक्ष ठेवून होते. त्याचे नागपुरातील लोकेशन मिळताच स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.