Type Here to Get Search Results !

पुणे महानगरपालिकेच्या MBBS डॉक्टरांना का नको ओपीडी, आयपीडी ड्युटी?; खाजगी रुग्णालयांकडून सुपारी घेतलीय काय?

 


पुणे दि ०५ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स): एकीकडे महापालिकेच्या रुग्णालयांत वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. कमला नेहरू, कोथरूड येथील सुतार दवाखाना, येरवडा येथे असे तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. अनेकदा प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला गुंतागुंतअसल्याचे सांगून ससूनला पाठवले जाते आणि तेथे त्यांचे नॉर्मलबाळंतपण होते, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच एमडी डाॅक्टरांची भरती केल्याने त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर शहरातील पालिकेच्या दवाखान्यात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना हाेणे अपेक्षित आहे. खासगीमध्ये या डाॅक्टरांची फी ७०० ते हजारांच्या घरात असते. मात्र, हे डाॅक्टर महापालिकेत चक्क कारकुनी करत बसले आहेत. हे डॉक्टर पर्मनंटअसून त्यांचा पगार दर महिना सव्वा ते दोन लाख रुपये पगार आहे. ऑफिस वर्क म्हणजे या विभागप्रमुखाकडून त्या विभागप्रमुखाकडे गप्पा मारत फिरण्याचेच महत्त्वाचे काम हे डॉक्टर करत आहेत.

या डाॅक्टरांना क्लास वनच्या खुर्चीवर बसायला फार आवडते. झाले तर केवळ सोनोग्राफी करण्याची तसदी ते घेतात तेदेखील आठवड्यातून दोन ते तीन वेळा. तर सीझेरियन प्रसूती, आयपीडी या किचकट गोष्टी त्यांना नको आहेत. जर हे तज्ज्ञ डॉक्टर महापालिकेच्या १८-१९ प्रसूतिगृहात गेले तर कमला नेहरू आणि ससूनवरील भार हलका होण्याला मदत होईल. मात्र हे स्त्रीरोगतज्ज्ञ कार्यालयात बसून, क्लार्कप्रमाणे फायली घेऊन फिरण्याचे काम करतात. दोन-दोन वर्षे एके ठिकाणी क्लार्कचे काम करत बसवले जात असल्याने त्यांना ऑपरेशनचा सरावही राहात नाही.

महापालिकेच्या पे रोलवर तीन रेडिओलॉजिस्टही आहेत. त्यांनी सोनोग्राफी करणे आवश्यक आहे, असे असताना एमडीआणि क्लासवन असलेले डॉक्टर सोनोग्राफी करतात.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.