Type Here to Get Search Results !

पुणेकरांनो सावधान! बनावट भिकारी करतायेत नागरिकांची लूट

 

पुणे, दि. 21 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): अंध व्यक्ती असल्याचं सांगत भीक मागत असलेल्या एक महिला आणि एका पुरूषाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हा सिंहगड रोडवरील वडगाव पुलाखालील असल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.

 

अभिषेक सोमवंशी यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आणि तो व्हिडिओ नितीन जगताप यांनी काढला असल्याचं सोमवंशी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

यामध्ये दोन व्यक्ती सिग्नलला थांबलेल्या गाड्यातील लोकांकडून भीक मागत आहे. अगोजर त्यातील पुरूष हा अंध असल्याचं सांगत एक महिला त्याला धरून प्रत्येकाकडून भीक मागताना दिसते. नंतर थोड्या वेळाने तो पुरूष महिलेचा आधार न घेताही इकडे तिकडे फिरताना दिसत आहे.

 

थोड्या वेळाने हा व्यक्ती रस्त्याच्या फुटपाथवरही बसला आहे. तर अंध व्यक्ती म्हणून भीक मागत सर्रासपणे हे दोघेही व्यक्ती नागरिकांची लयलूट करत आहेत. अशा बनावट भिकाऱ्यांपासून सावधानता बाळगणे सर्व नागरिकांना गरजेचे आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.