Type Here to Get Search Results !

वारजे मध्ये नववर्षाच्या स्वागताला टोळक्‍याने केला एकाचा खून; पाच जण गजाआड

 



पुणे, दि. 2 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी परिसरात शनिवारी नववर्षाच्या पहाटे दीड वाजता गुन्हेगारी कृत्यांमध्ये समावेश असलेल्या टोळक्‍याने पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून केला. भूमिपुत्र युवराज कांबळे (वय २०, रा. सरडे बाग, शिवणे, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून कांबळेचा भाऊ वीरफकीरा याने यासंबंधी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमीपुत्र कांबळे व त्याचा मित्र शनिवारी मध्यरात्री वारजे भागातील विठ्ठलनगर परिसरात मित्रांशी बोलत थांबले होते. त्यावेळी संशयित आरोपी निहाल शिंदे याने त्यास तेथे गाठले. त्यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून त्यांनी कांबळेवर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले, तसेच त्याच्या डोक्‍यात दगड घातला आणि तो गंभीर जखमी झाला. 

 

पोलिसांनी कांबळे यास तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तत्काळ तपास करून निहाल शिंदे (वय.२५ वर्ष) आणि अल्ताफ शेख (वय.१९ वर्ष दोघेही रा.वारजे माळवाडी, पुणे) यांच्यासह तीन संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके हाके  यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ता बागवे करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.