Type Here to Get Search Results !

भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; कोथरूड मधील घटना

 


पुणे, दि. 13 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूडमधील गुजरात कॉलनीत घडली. या प्रकरणी मोटारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत अशोक गायकवाड (वय 25, रा. संकुराज सोसायटी, संगम चौक, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अनिकेतचा भाऊ अमित (वय 31) याने या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अनिकेत कोथरूडमधील गुजरात कॉलनी परिसरातून पहाटे 3 च्या सुमारास निघाला होता. त्या वेळी सुंदरनगरी सोसायटीसमोर भरधाव मोटारीने दुचाकीस्वार अनिकेतला धडक दिली. उपचारासाठी अनिकेतला दवाखान्यात भारती करण्यात आले. परंतु गंभीर जखमी झालेल्या अनिकेतचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.

अपघातानंतर मोटारचालक पसार झाला. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.