Type Here to Get Search Results !

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या शिक्क्यांचा गैरवापर; गुन्हा दाखल

 

पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): एका कार्यालयीन शिपायाने लोहमार्ग उपअधीक्षकांच्या नावाने पत्र तयार करून ते दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात देत तेथील सीसीटीव्ही फुटेज मागविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी खडकी पोलीस लोहमार्ग उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार लोहमार्ग पोलीस मुख्यालयातील कार्यालयीन पोलीस कर्मचारी एस. सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार 7 नोव्हेंबर 2022 घडला आहे. एस सोनवणे हा लोहमार्ग पोलीस दलात आहे. लोहमार्ग उपअधीक्षकांच्या नावाने खोट्या सह्या करून त्यांच्या शिक्क्यांचा वापर करून या शिपायाने बनावट पत्र तयार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या कार्यालयात त्याची नेमणूक आहे. त्याने तक्रारदार यांच्या परवानगीशिवाय कार्यालयात प्रवेश करून कुलूप उघडले. चंद्रकांत भोसले व पोलीस अधीक्षक लोहमार्ग, पुणे या नावाचा गोल शिक्का तसेच त्यांच्या खोट्या सहीचा वापर करुन स्वत:च्या फायद्यासाठी बनावट पत्र तयार केले. ते खरे असल्याचे भासवून ते दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांना पाठविले. त्यांना हॉस्पिटलकडील सीसीटीव्ही फुटेज मागितले.

त्यांना सीसीटिव्ही फुटेज कशासाठी हवे होते, येवढा अट्टाहास करण्यामागाचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांना तपासासाठी ताब्यात घेतल्यानंतरच चौकशीत हा प्रकार समोर आला आहे, असे खडकी पोलिसांनी सांगितले. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वालकोळी करत आहेत.

https://youtu.be/Z10qzcF5GFM

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.