Type Here to Get Search Results !

Pune Crime: पुण्यात झाली सुरुवात; पाण्याचा फुगा मारल्याचा जाब विचारला म्हणून बाप-लेकावर कोयत्याने वार

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 7 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पाण्याचा फुगा मारल्याचा जाब विचारला म्हणून बाप-लेकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 4 मार्च रोजी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास घडली. पुण्यातील काळेवाडी (Kalewadi) परिसरातील भारतमाता चौकाजवळील (Bharatmata Chowk) रस्त्यावर ही घटना घडली. (pune crime news)

एका तरुणावर तीन अनोळखी मुलांनी पाण्याचा फुगा मारल्याचा जाब विचारला असता बाप-लेकावर कोयत्याने वार करण्यात आला. या हल्ल्यात बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी अभिषेक हौसराव बचाटे (Abhishek Hausrao Bachate) (वय-20, रा. काळेवाडी, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन तीन अनोळखी मुलांवर वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आहे.

हेही वाचा - होळी पूर्वी पौड रोडवरून मुंबई, मुळशी आणि बावधनला जाणाऱ्या वाहनचालकांचा वळसा कमी होणार

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी तक्रारदार अभिषेक बचाटे हे तापकीर चौक, काळेवाडी (Tapkir Chowk, Kalewadi) येथून घरी पायी चालत जात होते. यावेळी अनोळखी तीन व्यक्तींपैकी एकाने त्यांच्या पाठीमागून पाण्याने भरलेला पिशवीचा फुगा फेकून मारला. त्यामुळे त्याने मागे फिरुन त्याबाबत आरोपींना जाब विचारला असता त्याचा राग येऊन आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. बापलेकांचा ओरडण्याचा आवाज ऐकून तेथे रहात असणारे त्यांचे मामा नितीन प्रभाकर पवार व वडील हौसराव बचाटे हे मुलास वाचविण्यास आले. (pune crime news)

मात्र, यावेळी आरोपींमधील एका तरुणाने वडीलांवर कोयत्याने वार केला. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी मुलगा अभिषेक मध्ये पडला असता, त्याच्यावरही वार करण्यात आले. यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले. याप्रकरणी अभिषेक हौसराव बचाटे (वय-20, रा. काळेवाडी, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन तीन अनोळखी मुलांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes           

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/           

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times          

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes           

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.