Type Here to Get Search Results !

Pune News: करुणा आणि संपत्तीचा मेळ घालून माणुसकीचे काम करा : डॉ.संचेती.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

snehadhar gaurav puraskar to nandini jadhav aani rajashri patil - checkmate times

पुणे, दि. 24 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): समाजातील सक्षम नागरिकांनी करुणा आणि संपत्तीचा मेळ घालून माणुसकीचे काम केले तर पुढील पिढ्यांसाठी एक आशादायक जग निर्माण होईल, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती (Padma Vibhushan Dr. K. H. Sancheti) यांनी स्नेहालय संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात (Award Distribution Program of Snehalaya Sanstha) केले.

संकटग्रस्त महिलांकरीता पुणे येथे स्नेहाधार, हा उपक्रम स्नेहालय संस्था चालवते. सामाजिक क्षेत्रात निरलस योगदान देणाऱ्या आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी "स्नेहाधार गौरव पुरस्कार" (Snehadhar Gaurav Puraskar) देण्यात येतो. चौथ्या वर्षीचे पुरस्कार वितरण पुण्यातील प्रसिद्ध शल्यविशारद पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांच्या हस्ते झाले.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव (Nandini Jadhav) आणि विकलांगांसाठी काम करणाऱ्या पण स्वतः विकलांग असणाऱ्या अमरावतीच्या राजश्री पाटील (Rajashri Patil) यांना यंदाचे स्नेहाधार गौरव पुरस्कार देण्यात आले.

नंदिनी जाधव यांनी आपले ब्युटी पार्लरचे काम बंद करून ग्रामीण आणि शहरी भागातील अंधश्रध्दा निर्मूलनाचे (Elimination of superstitions) काम करताना जटा मुक्तीचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे. त्यांनी जवळ जवळ साडे तीनशे स्त्रियांना जटा मुक्त केले आहे. यातील स्त्रिया स्वतःच मानसिक दृष्ट्या जटा ठेवण्याच्या विरूध्द नसतात. त्यांना त्यांच्या नातेवाईकांना सल्ला देऊन या अंध श्रद्धेतून त्यांना मुक्त करण्याचे महत्वाचे काम त्या करत आहेत.

राजश्री पाटील एम फिल करत असताना अपघात ग्रस्त होऊन त्यांच्यावर पाठीच्या मणक्यांच्या जखमेमुळे व्हील चेअर वरच पुढील आयुष्य जगण्याची वेळ आली. स्वतःचे नैराश्य, शारीरिक पीडा यावर मात करून त्यांनी मुलांच्या शिकवण्या सुरू केल्या. आता त्या अशा व्हील चेअर वरच जीवन असणाऱ्या इतर व्यक्तींची कार्यशाळा घेऊन त्यांचे नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा - ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

कार्यक्रमाचे प्रायोजक आप्पा अष्टेकर (Sponsor of the program Appa Ashtekar) यांनी अहमदनगरच्या स्नेहालय या संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत असे अनेक कार्यकर्ते समाजात निर्माण व्हावेत ही अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संचेती यांनी आपल्या यशाचे मूळ आई वडिलांचे सुसंस्कार असल्याचे नमूद करत आपल्याला माणूस म्हणून मिळत असलेला भरपूर वेळ माणूसकीच्या कामासाठी सर्वांनी द्यावा ही सगळ्यांना विनंती केली.

धनंजय आणि कविता खरवंडीकर (Dhananjay and Kavita Kharvandikar) यांनी त्यांची कन्या श्रुती हिच्यासह सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम (singing program) सादर केला.

हेही वाचा - मित्राने दिलेल्या वचनांची पूर्ती ही साहित्य क्षेत्रातील दुर्मिळ घटना; डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes            

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes            

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.