Type Here to Get Search Results !

खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला; बावधन करांना महावितरणचे सबस्टेशन मिळण्यासाठी सुळे आक्रमक

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


MP Supriya Sule will go on hunger strike; Sule was furious for Mahavitran's substation



MP Supriya Sule will go on hunger strike; Sule was furious for Mahavitran's substation

 

पुणे, दि. 4 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): वारंवार मागणी आणि पाठपुरावा (Frequent requests and follow-ups) करूनही पूर्तता होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या (MP Supriya Sule Irritated) असून, त्यांनी आता थेट उपोषणाचाच इशारा (Warning of Hunger Strike) दिला आहे. महावितरणच्या बावधन येथील सबस्टेशनसाठी (MSEDCL Sub-Station for Bavdhan) त्यांनी हा इशारा दिला असून 20 नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट (Supriya Sule Tweet) केले आहे.

 

 

बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) बावधन सबस्टेशनसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. यासाठी आवश्यक असणारी जागाही सुचविण्यात आली आहे. परंतु तरीही येथे सबस्टेशन उभारण्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही, असे सांगत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. महावितरण, पुणे महापालिका (Pune Municipal Corporation), पीएमआरडीए (PMRDA) आणि पुणे जिल्हाधिकारी (Pune Collector) यांना टॅग करत त्यांनी हे ट्विट केले असून येत्या 20 नोव्हेंबर पर्यंत सबस्टेशन बाबत कार्यवाही झाली नाही, तर आपण स्वतः उपोषणाला बसू असा इशारा दिला आहे.

 

 

महावितरणने याची तातडीने दखल घेऊन सबस्टेशनचा विषय मार्गी लावला नाही तर बावधनकरांसाठी आपण स्वतः 20 नोव्हेंबरला येथे उपोषणाला बसणार आहोत. जनतेच्या सुविधेसाठी (Public Convenience) हे सबस्टेशन आवश्यक आहे, परंतु जागा सुचवलेली असतानादेखील उर्जा खात्याकडून (Energy Ministry) याबाबत कार्यवाही होत नाही हे खेदजनक (Unfortunate) आहे, अशी खंतही (Regret) त्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

 

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.