Type Here to Get Search Results !

कर्वेनगर मधील कोविड लसीकरण केंद्रामधून महत्वाच्या वस्तुचीच चोरी; लसीकरण खोळंबणार?

 

पुणे, दि. २६ (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर मधील शाहू कॉलनी गल्ली क्र. १ मध्ये असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञातांनी लसीकरणासाठी सर्वात महत्वाची वस्तू असलेला संगणक संच चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुढील लसीकरण खोळंबणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

 वारजे मध्ये कोरोना बाधित फॅमिली चालवत होती किराणा दुकानं; पालिकेने दुकानं केलं सील

शाहू कॉलनी गल्ली क्र. १ मधील पुणे महानगरपालिकेच्या नियोजित शाळेत सोमवार दि. २३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ५.३० ते मंगळवार दि.२४ ऑगस्ट २०२१ सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, जीन्याखालील खोलीच्या दाराचा कडी कोयंडा उचकटून आतमध्ये ठेवण्यात आलेला संगणक संच आणि कडी कोयंड्याचा बॉक्स असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला असल्याबाबत समर्थ पवार (वय.२० रा.वारजे माळवाडी, पुणे) यांनी वारजे पोलिसात तक्रार दिली आहे. समर्थ पवार हे या लसीकरण केंद्राचे कामकाज पाहतात. मात्र लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे केंद्र बंद असल्याचा गैरफायदा घेऊन, अज्ञात चोरट्याने ही चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 रिक्षाचालकांना सरकारने नाही मात्र यांनी केली कोरोना काळात मदत

आरोग्य विभागाच्या मागणीवरून विद्युत विभागाच्यावतीने लसिकरणात सहजता येण्यासाठी हा संगणक संच पुरवण्यात आला होता. सदरील लसीकरण केंद्रावर ठेकेदारी पद्धतीने नियुक्त केलेले कर्मचारी असून, त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. लसीकरणात व्यत्यय येऊ नये याकरिता विद्युत विभागाकडून दुसऱ्या संगणकाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, लसीकरण कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही याची दक्षता क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून घेतली जात असल्याचे विभागीय आरोग्य अधिकारी डॉ अरुणा तारडे यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले. पोलीस उपनिरीक्षक जनार्दन होळकर पुढील तपास करत आहेत.

 पुण्यातील धक्कादायक घटना; कोरोना संशयितांच्या क्वारंटाईन सेंटर मधील कर्मचाऱ्यांना झाली कोरोनाची लागण

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.