Type Here to Get Search Results !

समाविष्ठ गावांच्या विकास आराखड्यावर मार्गदर्शन करण्याकरिता भाजपा सहकार आघाडी आघाडीवर

 

पुणे, दि. २५ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांमध्ये राष्ट्रवादी’ने पालक नगरसेवक नियुक्त केल्यानंतर भाजपा’ने देखील पालक नगरसेवकांची नियुक्ती करत त्या गावांमध्ये अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. तर त्यावर जाऊन भाजपा सहकार आघाडी’ने जनजागृतीची आघाडी घेत, प्रत्यक्ष समाविष्ठ गावांमधील नागरिकांना पीएमआरडीए’ने केलेल्या विकास आराखड्याबाबत सखोल माहिती मिळण्यासाठी तज्ञांच्या उपस्थित चर्चासत्र मेळाव्यांचे आयोजन केले. विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन करत, हरकती आणि सूचना कशा नोंदवायच्या यासाठी जनजागृती सुरु करत आघाडी’ने समाविष्ठ गावांमध्ये घेतली आहे.

 पुण्यातील नांदेड सिटी मध्ये मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय; परदेशी तरुणींची सुटका

“भाजपा आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने सामावेश झालेल्या गावांच्या विकास आराखडा (२०२१ - २०४१) या विषयावर माहिती आणि चर्चासत्राचे आयोजन सहकार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, किरकटवाडी येथे करण्यात आले होते. यात किरकटवाडी, नांदोशी गावातील शेकडो शेतकरी आणि नागरिक ऊपस्थित असलेल्या या चर्चासत्रास आराखडा अभ्यासक इंजिनिअर चेतन पेठे यांनी मार्गदर्शन केले.

 तुम्हाला अनुभवी आणि मोठ्या वकिलांकडून मोफत कायदेशीर सल्ला पाहिजे का?; मग हा व्हिडीओ तुमच्यासाठीच

अनेक शेतकरी आणि नागरिकांनी आराखड्याविषयी आपले प्रश्न, अडचणी या चर्चासत्रात मांडल्या. विकास आराखड्याचा योग्य अभ्यास करून, नवीन हद्दीतील नागरिकांनी या भागाचा नव्याने विकास होत असताना, आपल्या सामुहिक हिताच्या सुचना, तसेच आपल्या तक्रारी या विषयी हरकतींवर भर दिला पाहिजे. तरच एक विकासाचे एक सर्वसमावेशक योग्य मॅाडेल ऊभे राहू शकेल असे मत चेतन पेठे यांनी मांडले.

 शहराच्या सौंदर्यात बाधा न आणता उद्योग आघाडीने केले मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत

या चर्चासत्रास आयोजक सचिन दशरथ दांगट यांच्यासह पालक नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका निता दांगट, भाजपा’चे खडकवासला विधानसभा अध्यक्ष सचिन मोरे, अनंत दांगट, किशोर पोकळे, किरकटवाडी गावाचे सरपंच गोकुळ करंजावणे, नांदोशी गावाचे सरपंच भाऊसाहेब किवळे, सहकार आघाडी उपाध्यक्ष निळकंठ शेळके, किरण हगवणे, अनिल मते, शेखर हगवणे, सचिन दगडे यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 चंद्रकांत पाटलांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीची उडवली खिल्ली; युती बाबत महत्वपूर्ण विधान

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.