Headlines
Loading...
महिलांवरील बलात्कार आणि अत्याचार थांबवण्यासाठी हे साहित्य करायला हवे: राजेंद्र वाघ

महिलांवरील बलात्कार आणि अत्याचार थांबवण्यासाठी हे साहित्य करायला हवे: राजेंद्र वाघ

 


पुणे, दि. २० (चेकमेट टाईम्स): सध्या कुठलेही वर्तमानपत्र घ्या किंवा अनेक कथा कादंबऱ्यामधून महिलांवर अन्याय होतो, अत्याचार होतो, बलात्कार होतो, महिला हुंडाबळी ठरतात, आत्महत्या करतात अशाप्रकारचे लिखाण वाचायला मिळते. मात्र जर महिलांनी अशा घटनांना केलेला प्रतिकार, हाणून पाडलेल्या चोरी, दरोडे, बलात्काराच्या घटना, हुंडा प्रथेसह अनेक मानवी मूल्यांच्या अनैतिक प्रथांच्या विरोधात घेतलेली भूमिका याची वृत्त, साहित्य पुढे आल्यास महिलांमध्ये स्वयंप्रेरणा जागृत होईल आणि महिला स्वत:चा स्वत: प्रतिकार करू लागतील. पर्यायाने महिलांवरील अत्याचार थांबवण्यास मदत होईल असे मत ज्येष्ठ कवी आणि पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य अकादमीचे कोषाध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी व्यक्त केलंय.

 

प्रदूषण राजकीय देखील असतं, माणसं मारायचंही असू शकतं???; प्रदूषणावर भाष्य करणारी सडेतोड कविता


शब्दवेल साहित्य समूह मंच पुणे कार्यकारिणीचा स्नेहमेळावा, कवी संमेलन आणि ललित लेख वाचन कार्यक्रमाचे नुकतेच सिंहगड रस्त्यावर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी चेकमेट पब्लिकेशन्स अँड पब्लिसिटीचे मुख्य संचालक धनराज माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

झेपणार असेल तरचं ऐका; काळजाला भिडणारी आईवरील अतिशय छान कविता by रमजान मुल्ला


पुढे बोलताना वाघ यांनी, शब्दवेलच्या उपक्रमांचे कौतुक करत, विशेषतः कोरोना काळात नित्याने राबवलेल्या ऑनलाईन साहित्य पसरवण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे. त्याच्या माध्यमातून आपले साहित्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शब्दवेल घेत असलेले कष्ट बहुमोल आहेत असेही राजेंद्र वाघ यांनी म्हटले. तर काही कवी आणि साहित्यिकांना कवितांसह ललित लेखांचे सादरीकरण कसे केले पाहिजे यावर वाघ यांनी मार्गदर्शन केले.

 

सौभाग्याचं कुंकू तेच तिचं धन; आईवर प्रेम करणाऱ्या महिला, मुली आणि मुलांनी नक्की बघा


यावेळी शब्दवेलच्या पुणे जिल्हा अध्यक्ष विद्या अटक यांनी प्रास्ताविक करताना त्यांची “शब्द” ही कविता सादर केली. तर “अंबाबईचा उदो उदो” या जोगवा मागायला आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना ‘अटक’ यांनी आपल्या ललित लेखात मांडली. वासना कधी, कुठे, कोणाची शिकार करेल हे सांगता न येणारा हा ललित लेख कार्यक्रमाच्या सांगतेला आणि अध्यक्षीय भाषणापूर्वी असल्याने अध्यक्षीय भाषणात वाघ यांनी यावरच भाष्य करणे पसंत केले. दरम्यान विद्या अटक यांच्या या ललित लेखाचे वाचन झाल्यावर पुढील काही क्षण हॉल मधील वातावरण गंभीर झाले होते.

 

महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी’च काय, सर्वच राजकीय पक्षांवर परखड भाष्य करणारी कविता


शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले या वाक्याने आपल्या सुत्रासंचलनाला सुरवात केलेल्या रश्मी थोरात यांनी “असे व्हावे” ही कविता आणि “बुलबुल पक्षाची अंघोळ” हा ललित लेख सादर केला. या ललित लेखात त्यांनी आपल्या घरातील खिडकीतून बाहेर बागेतील एका कुंडीत ठेवलेल्या पाण्यात बुलबुल कशा पद्धतीने अंघोळ करतो, अंघोळीचा आनंद घेतो आणि पाहणाऱ्याला आनंद देतो याचे हुबेहूब चित्रण उभे केले.

 

रामदास आठवले यांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादी वर तुफान हल्ला; पहाच दणकेबाज कविता


Nothing is पर्मनंट” म्हणत प्रेमभंग विषयावरील कविता सादर करत अमोल चरडे यांनी, उत्तम चालीत “गुलाब ; न संपणारा दरवळ” हा ललित लेख सादर केला. ललित लेखाचा शेवट स्वतःच्या ‘अमोल’ नावाने करण्यास ते विसरले नाहीत. त्यामुळे या लेखाला देखील एक वेगळे वजन प्राप्त झाले होते.

 

आचार्य अत्रे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पहा काय म्हणालेत रामचंद्र देखणे


नलिनी पवार यांनी देशाभिमान जागृत करणारी राष्ट्रध्वजावरील कविता सादर केली. त्यांची ही कविता पुढील काळात एखाद्या चित्रपटातील गाणे म्हणून ऐकायला मिळाल्यास नवल वाटायला नको, एवढी सुंदर ही कविता रचली गेली आहे. तर आयत्यावेळी सुचलेला “जय जवान - जय किसान” ललित लेख त्यांनी सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या अटक, सूत्रसंचालन रश्मी थोरात यांनी, तर नलिनी पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सर्व उपस्थितांना कविता आणि ललित लेख सादरीकरण केल्याबद्दल प्रशस्तीपत्रके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 

काव्यानंद कट्ट्यावर रंगल्या पावसाच्या कविता; उलगडले पावसाचे रंग, स्वभाव आणि बरंच काही


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

आमच्या डेली हंट’ची लिंक : https://profile.dailyhunt.in/ctnnpune


1 टिप्पणी

  1. फारच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद , मनःपूर्वक अभिनंदन राजेंद्रजी !

    उत्तर द्याहटवा