Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी यांची निवड फौजिया खान यांनी केली नावाची घोषणा

 

Former MLA Vidya Chavan has been elected as the NCP's women state president by National President MP Faujia Khan

 मुंबई, दि.४ मे २०२२ (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी (Women State President of NCP) माजी आमदार विद्या चव्हाण (Former MLA Vidya Chavan) यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान (MP Faujia Khan) यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar, Chairperson of State Women's Commission) यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीचे (Nationalist Congress Party Womens President) हे पद रिक्त झाले होते. त्या पदासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादीने सर्वांची नाराजी टाळत हे पद देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे.

 


सध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्षपद (NCP Divisional President) पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. यावेळी नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.

 

विद्या चव्हाण यांनी ही नियुक्ती स्विकारत असल्याचे सांगतानाच महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाला आहे. महिला वर्ग त्रासला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन असे सांगतानाच माध्यमाकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.