Headlines
Loading...
कोथरुडमधील सराईत सोन्या पवार टोळीवर मोक्का

कोथरुडमधील सराईत सोन्या पवार टोळीवर मोक्कापुणेदि.२३ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील कोथरुड परिसरात दहशत माजवणारा सराईत दिनानाथ उर्फ सोन्या पवार आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही ८९ कारवाई आहे.

दिनानाथ उर्फ सोन्या गोरक्षनाथ पवार (वय २२, रा शास्त्रीनगर, कोथरुड), अक्षय उर्फ ज्वाला शांताराम येवले (वय २३, रा. सुतारदरा, कोथरुड), प्रदीप उर्फ पद्या भोला मिर्धा (वय १६, रा. सूस गाव, ता. मुळशी) यांच्यासह टोळीतील एका अल्पवयीन विरोधात कारवाई करण्यात आली आहे. संबंधित टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुचाकी तोडफोड, बेकायदा शस्त्र बाळगणे, दरोड्याचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारण झाली नव्हती. त्यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यावतीने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर पवार टोळी विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील सात महिन्यात २६ सराईत टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

0 Comments: