Type Here to Get Search Results !

पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द येथे दुर्मिळ जातीची दोन कासवे मृतावस्थेत



पुणेदि.२३ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): खडकवासला धरणात १० ते १५ वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात वास्तव्य असलेली कासवे अलीकडच्या काळात दिसेनाशी झाली आहे. असे असताना गुरुवारी (दि. २१) पुणे- पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द येथील खडकवासला धरणाच्या तिरावर दुर्मिळ जातीची दोन कासवे मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

मृत कासवांची माहिती मिळताच खानापूर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ती कासवे ताब्यात घेतली. दोन्ही मृत कासवे शवविच्छेदनासाठी खानापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेली आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोऱ्हे खुर्द येथील स्मशानभूमी जवळील ग्रीन थंब संस्थेने उभारलेल्या एसकेएफ निसर्ग माहिती केंद्राची पाहणी करण्यासाठी धरणाच्या तीरावरून काही अभ्यासक, व तरुण चालले होते. धरण तीरावरील पाणलोट क्षेत्रात दोन कासवे त्यांना मृतावस्थेत दिसली. त्यातील एक कासव दोन फूट लांबीचे तर दुसरे अर्धा ते पाऊण फूट लांबीचे आहे.

पाण्याच्या लाटांमुळे दोन्ही कासवे तीरावरील वाळू, दगड-गोट्यात‌आली आहेत. मावळा संघटनेचे तुषार कचरे, ग्रीन थंब संस्थेचे स्वयंसेवक संजय लहाने, तोरणे आदींनी याची माहिती खानापूर येथील वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.