Type Here to Get Search Results !

सिंहगड रस्त्यावरील सरकारी जागेत बांधलेल्या अनधिकृत दुकानांना आग, तीन दुकाने आगीत भस्मसात

 


पुणेदि.२५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): धायरी-सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी फाट्याजवळ अनधिकृत दुकानांना आग लागल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. गॅस गळतीमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी फाटा येथे केंद्रीय जल व संशोधन केंद्राच्या जागेवर अनधिकृतपणे दुकाने थाटून ती दुकाने भाड्याने देण्याचे प्रकार सुरू आहेत. अशातच रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येथे असणाऱ्या श्रीनाथ स्विट होम, महाराष्ट्र मटन शॉप व सायबा अमृततुल्य या दुकानांना अचानकपणे आग लागली. या आगीत या तीनही दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.ही दुकाने केंद्रीय जल व संशोधन केंद्राच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान पहाटे या दुकानांना आग लागल्याचे एका नागरिकाने अग्निशमन दलाला सांगितले. त्यानंतर पीएमआरडीएच्या नांदेड सिटी येथीलअग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.