Type Here to Get Search Results !

हे पुणे आहे की पंजाब, भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारीने बिथरले पुणेकर

 


पुणे दि.२९ जुलै (चेकमेट टाईम्स): सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात  फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येरवड्यात मारहाणीची घटना घडली. हातात काठ्या घेऊन एकमेकांना हाण्यात आले. भर रस्त्यातील फ्री स्टाईल हाणामारीची जोरदार चर्चा आहे.

येरवड्यातील दृश्य पाहून हे पंजाब असल्याचे वाटत होते. मात्र, ते तर पुणे आहे. येरवडा येथील शिवराज चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली. भर रस्त्यावर मारामारीचा प्रकार घडला असून घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर गंभीर जखमी झाले आहेत. जागेच्या वादातून हा प्रकार घडला आहे. मारामारी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. 

येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगारांचा लाठी आणि काठ्यांचा नंगानांच सुरु असताना पोलिसांचा गुन्हेगारावर वचक नसल्याचे नागरिक बोलत आहेत. येरवडा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देखील काम करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.