Type Here to Get Search Results !

एका महिलेवर पाळत ठेवून तिचे फोटो काढणारे डिटेक्टीव गजाआड; पुणे पोलिसांची कारवाई

 


पुणे, दि.10 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): एका महिलेवर पाळत ठेवून तिचे फोटो काढणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ते दोघे एका गुप्तहेर एजन्सीमध्ये काम करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. कोरेगाव पार्कमधील एका ३२ वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

नीलेश लक्ष्मणसिंग परदेशी (वय २५, रा. वडगाव मावळ) आणि राहुल गुणवंतराव बिरादार (वय ३०, रा. देहूगाव) अशी संशयितांची नावे आहेत. परदेशी याची गुप्तहेर संस्था असून, बिरादार हा त्याचा सहायक आहे. गेल्या डिसेंबर महिन्यापासून हा प्रकार सुरू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघे आरोपी हे फिर्यादी महिलेचा पाठलाग करुन आक्षेपार्ह छायाचित्र एका व्यक्तीला पाठवत होते. याबाबत त्या महिलेला संशय आल्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘भरोसा सेल’ तेथे तक्रार केली होती. परंतु काही कारवाई न झाल्यामुळे महिलेने सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर यांची भेट घेतली.

त्यानंतर पोलिसांनी या महिलेवर पाळत ठेवणाऱ्यांचा शोध सुरु केला. फिर्यादी महिला ही कोरेगाव पार्कमधील एका हॉटेलमध्ये ७ जानेवारी 2023 रोजी गेली. त्यावेळी ते दोघे लपून महिलेचे फोटो काढत होते. त्यावेळी साध्या वेशातील पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.