Type Here to Get Search Results !

पालिकेच्या दवाखान्यांमध्ये सर्पदंशावरील औषधे उपलब्ध करा; दुधानेंची मागणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Make snakebite medicines available in municipal clinics; Demand for milk


पुणे, दि. 12 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे कर्वेनगर (Warje Karvenagar) परिसरात सर्पदंश (Death by Snake Bite) होऊन गेल्या पाच वर्षात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता पावसाळा (Rainy Season) सुरु आला असून, त्यामुळे वाढलेल्या गवतात, झाडाझुडपात सर्प विहार (Snake Travelling in Grass) वाढला असून, त्यांचा दंश झाल्यास, त्यावर लगेच उपचार होणे गरजेचे आहेत. त्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्प दंशावरील औषधे (Antidote on Snake Bite) उपलब्ध करण्याची मागणी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने (Ex Corporator Lakshmi Dudhane) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने (Swapnil Dudhane) यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

 

 

वारजे, शिवणे, कर्वेनगर, कोथरुड (Warje, Shivane, Karvenagar, Kothrud) परिसरामध्ये मोठया प्रमाणात डोंगर व घनदाट वृक्षांचा (Pune Hills) भाग आहे. तर निसर्गप्रेमी (Nature Lovers) नागरिकांचा अधिवास आलेल्या या नागरी भागामध्ये देखील हिरवळ दिसून येते. मात्र त्यात निसर्गाच्या अधिवासातून, मानवी अधिवासात येणाऱ्या साप आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दंशाचे (Bites of Reptiles) प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये “घोणस” (Russell's Viper Snake) सारख्या अतिविषारी साप (Very poisonous snake) आणि सापाच्या पिलांचे अस्तित्व या भागामध्ये दिसून आले आहे.घोणस” हा साप अतिशय विषारी असुन, त्याच्या मधील “हिमोटॉक्सीक” विषामुळे (Hemotoxic Poison) माणसाचा मृत्यु होण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच हा साप चावल्यानंतर त्या व्यक्तीस अर्धा ते एक तासाचे आत (Antidote) उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते, नाहीतर हे विष रक्तात मिसळुन रक्त त्वरित गोठवते (Blood Coagulates). त्यामुळे माणूस दगावतो.

 

 

तसेच घोणस साप हे अंडी न देता, तिच्या पोटातुन एकाच वेळी २५ ते ५० पिल्लांना जन्म देत असल्याने, यांची संख्या या सर्व परिसरात वेगाने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वारजे, शिवणे, कर्वेनगर, कोथरुड परिसरातील पुण महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये याच्या उपचाराकरिता (Antidote) औषधे उपलब्ध करावीत, अशी मागणी दुधाने यांनी केली आहे. सदयस्थितीला पुण्यातील महाराष्ट्र शासनाच्या ससुन (Sasoon Hospital) आणि पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात (Kamala Neharu Hospital) हे डोस उपलब्ध आहेत. मात्र उपनगर आणि ग्रामीण (Suburban and Rural Pune) भागातील नागरिकांना शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रुग्णालयात जाऊन उपचार घेईपर्यंत, रुग्ण दगावतो. त्यामुळे पुणे शहरातील सर्वच महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये (Pune Municipal Hospitals) हे डोस उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी दुधाने यांनी केली आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.